Exclusive: ‘दोस्ताना 2’ मधील फेरबदल धर्मा प्रॉडक्शनला पडणार 20 कोटींइतका महाग

By  
on  

पीपिंगमूनने तुम्हाला एक्सक्लुसिव्हली सांगितलं होतं की, कार्तिक आर्यनच्या अनप्रोफेशनल बिहेव्हिअर मुळे धर्मा प्रॉडक्शनने त्याला दोस्ताना 2 मधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता हा फेरबदल धर्मा प्रॉडक्शनला जवळपास 20 कोटींइतका पडणार आहे. कार्तिकने 20 दिवसांसाठी शुटिंग केलं होतं.

 
पण आता सिनेमाला पुन्हा सुरुवात करावी लागणार आहे. यात धर्मा प्रॉडक्शनचं जवळपास 20 कोटींचं नुकसान असल्याचं बोललं जात आहे. सध्या सिनेसृष्टी बंद असताना हे नुकसान जास्त आहे. पण कंपनीइतकं नुकसान सहन करण्यास तयार असेल तर कार्तिकचे किती नखरे यापुर्वी सहन करावे लागले असतील याची कल्पनाच केलेली बरी.

आता धर्मा प्रॉडक्शनने पुन्हा कधीही कार्तिकसोबत काम न करण्याची शपथ घेतली आहे. असं बोललं जात आहे की जान्हवीसोबत ब्रेक अप झाल्यानंतर कार्तिकने शुटिंगला अडथळे आणण्यास सुरुवात केली. कार्तिकसारख्या आऊटसायडरला घेऊन करणने त्याचा मोस्ट अवेटेड सिक्वेल बनवण्याचा प्लॅन केला होता. जान्हवी, लक्ष्य ललवानी आणि कार्तिकला घेऊन दोस्तानाचा वारसा पुढे नेणार होता.

Recommended

Loading...
Share