PeepingMoon Exclusive: कार्तिक आर्यनला डिच्चू दिल्यानंतर धर्मा प्रोडक्शनचा 'दोस्ताना -2' अक्षय कुमार करणार साईन

By  
on  

अभिनेता कार्तिक आर्यनला त्याच्या कर्माची फळं आता भोगावीच लागणार आहेत असं दिसतंय. कारण, धर्मा प्रोडक्शनने ‘दोस्ताना- 2’ सिनेमातून कार्तिकची हकालपट्टी केल्यानंतर त्याच्या जागी आता बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारला असणार असल्याच्या चर्चा आहेत. इंडस्ट्रीतील सूत्रांच्या म्हणण्यानुसार कार्तिकला त्याचे नखरे चांगलेच भोवलेले दिसतायत. कार्तिकच्या बेताल आणि अनफ्रोशनल वागण्याला कंटाळून धर्मा प्रोडक्शनने त्याला ‘दोस्ताना- 2’ मधून बाहेरचा रस्ता दाखवला. 

‘दोस्ताना- 2’ मधील कार्तिक साकारत असलेल्या भूमिकेत अक्षय कुमार चपखलच बसतोय, हे करण जोहर सारखा जाणकार नक्कीच चांगलं समजू शकतो. कुठल्याही प्रकारच्या भूमिका आपल्या स्टाईलने साकारण्यात अक्षय कुमारचा हातखंडा असतो. 2019 या सालात अक्षयने करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनसोबत दोन सुपरहिट सिनेमे केले ते म्हणजे केसरी आणि गुड न्यूज. 

पिपींगमून डॉट कॉमने मागच्या आठवड्यात कार्तिकची ‘दोस्ताना- 2’ मधून झालेल्या हकालपट्टीची ब्रेकींग बातमी दिल्यानंतर त्याच्या जागी कोण येणार याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. 
 

Recommended

Loading...
Share