Exclusive: करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’ मध्ये अक्षय कुमार दिसणार जान्हवी कपूरच्या भावाच्या भूमिकेत

By  
on  

सध्या सगळ्यात चर्चेत असलेला सिनेमा म्हणजे ‘दोस्ताना 2’ यामध्ये अ‍क्षय कुमारने कार्तिक आर्यनला रिप्लेस केलं आहे. अक्षय या सिनेमात जान्हवी कपूरच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. 2008 मध्ये दोस्तानाचा पहिला सिनेमा आला होता. यामध्ये प्रियांका चोप्रा जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन होते. करण जोहर आणि त्याच्याशी संबंधित कुठलीच फिल्म कंपनी यापुढे कार्तिक आर्यनसोबत काम करणार नाही.

 

सूत्रांच्या माहितीनुसार धर्मा प्रोडक्शनने दोस्ताना- २ या आपल्या आगामी सिनेमातून कार्तिक आर्यनची हकालपट्टी केली आहे. तसंच भविष्यात त्याच्यासोबत पुन्हा कधीच ही निर्मितीसंस्था काम करणार नाही असं समोर आलं आहे. धर्मा प्रोडक्शन कार्तिकच्या अनफ्रोफेशन वागण्याला प्रचंड वैतागलं आणि त्यांनी हा निर्णय घेतला.

Recommended

Loading...
Share