PeepingMoon Exclusive: सैफ अली खान रिलायन्स एन्टरेन्मेन्टच्या सिनेमात साकारणार वैज्ञानिक डॉ. होमी भाभा

By  
on  

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता सैफ अली खान करिअरच्या या टप्प्यावरसुध्दा आपल्या प्रतिभावान अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर उलगडतो. आपल्या प्रत्येक आगामी प्रोजेक्टमधून सैफ रसिकांचं लक्ष वेधून घेतोय. अलिकडेच अली अब्बास जफरच्या तांडवमध्ये राजकीय नेत्याची भूमिका साकारून त्याने सर्वांनाच एक शानदार सरप्राईज दिलं. त्यानंतर भूत पुलिसमध्येही त्याच्या वेगळ्या धाटणीची भूमिका पाहायला मिळाली. तसंच ओम राऊतच्या बिग बजेट आणि महत्त्वकांक्षी आदिपुरुषमध्ये सैफ अली खान रावण साकारतोय. त्यामुळे सैफला आदिपुरुषमध्ये रावण साकारताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.  याशिवाय त्याच्याजवळ विक्रम वेधाच्या रिमेकचंसुध्दा प्रोजेक्ट आहे. यात अभिनेता ह्रतिक रोशनच्या अपोझिट सैफ पोलिस अधिका-याच्या भूमिकेत पाहायला मिळेल. 

आता पिपींगमून डॉट कॉमला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार सैफ अली खानने, भारताचे महान अणु वैज्ञानिक डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा बायोपिक साईन केला आहे. या सिनेमात त्यांचा जीवनपट उलगडणार असून त्यांच्या संशयास्पद मृत्यूवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. रिलायन्स एन्टरट्न्मेन्टची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं नाव 'Assassination of Homi Bhabha' आहे. तर विक्रमजीत सिंह या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतायत.  सैफ होमी भाभांची मध्यवर्ती भूमिका साकारताना पाहायला मिळेल. 

 

 

Recommended

Loading...
Share