Exclusive: करिना कपूर खान किंवा दीपिका पदुकोण हृतिक रोशन आणि महेश बाबूसोबत दिसणार ‘रामायण’मध्ये

By  
on  

प्रसिद्ध दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या महेश बाबू आणि हृतिक रोशनचा रामायण हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमात मोठी स्टारकास्ट असण्याची चर्चा जोर धरु लागली आहे. आता या सिनेमात सीतेच्या भूमिकेसाठी दीपिका आणि करिना कपूरचं नाव चर्चेत असल्याची एक्स्लूसिव्ह बातमी पीपिंगमूनच्या हाती लागली आहे. 

करिनाने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ती ऐतिहासिक तख्तमध्येही दिसणार आहे. पण करिनाने नितेश तिवारीचा सिनेमा स्विकारल्यास ती हायेस्ट पेड अ‍ॅक्ट्रेस बनू शकते.  दीपिकाही ही भूमिका साकारू शकते असं बोललं जातं. दीपिकाकडे द्रौपदी हा महत्वकांक्षी प्रोजेक्ट आहे. पण जर दीपिकाने हा सिनेमा स्विकारला तर द्रौपदीच्या  व्यक्तिरेखेवर पाणी सोडल्यासारखं होईल. त्यामुळे या दोघी काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं आहे.

Recommended

Loading...
Share