Exclusive: करण जोहरच्या पार्टी सेलिब्रेशनचे दावे खोटे, वाचा सविस्तर

By  
on  

उद्या करण जोहर आपला 49 वा वाढदिवस साजरा करतो आहे. एका बॉलिवूड साईटनुसार करण हा वाढदिवस अलिबाग येथे धुमधडाक्यात साजरा करणार असल्याचं सांगितलं होतं. या सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरु असून अर्ध्याहून अधिक बॉलिवूडकरांना याचं आमंत्रण गेल्याचं समोर येत होतं. 

पण ही बातमी अफवा असल्याचं समोर येत आहे. सद्यपरिस्थितीमध्ये करणने वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पीपिंगमूनला एक्सक्लूसिव्हली मिळालेल्या माहितीनुसार रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, विराट कोहली, अनुष्का शर्मा या सेलिब्रिटींना या संदर्भात कोणतंही आमंत्रण गेलं नाही.
सद्य परिस्थितीमध्ये पार्टी करणं हा वेडेपणाच ठरेल असं करणच्या जवळच्या व्यक्तीकडून समजलं. पोर्टलच्या बातमीनुसार पाहुण्यांची मोठी यादी आहे. पार्टीचं 3 दिवसाचं सेलिब्रेशन होतं. या यादीत शाहरुख- गौरी खान, कैटरीना कैफ, विक्की कौशल, वरुण- नताशा धवन, अभिषेक - ऐश्वर्या राय बच्चन, मनीष मल्होत्रा, कृति सेनन, जाह्नवी कपूर, करीना कपूर खान, सैफ अली खान, मलाइका अरोरा आणि  अर्जुन कपूर यांचा समावेश होता.

Recommended

Loading...
Share