Exclusive: रितेश देशमुख नेटफ्लिक्ससोबत डिजीटल डेब्यु करण्यास सज्ज, शशांक घोषचं दिग्दर्शन

By  
on  

ओटीटी आता मोठ्या कलाकारांसाठीचं माध्यम म्हणूनही उदयास येत आहे. अनेक कलाकार आता ओटीटीकडे वळताना दिसत आहेत. आता अभिनेता रितेश देशमुखही आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पिपींगमूनला एक्सक्लूसिव्हली मिळालेल्या माहितीनुसार, रितेश देशमुख नेटफ्लिक्ससोबत डिजीटल डेब्यु करण्यास सज्ज झाला आहे. शशांक घोषचं दिग्दर्शन असलेल्या नेटफ्लिक्स सिनेमातून तो डेब्यु करणार आहे.

 

शशांक यांनी यापुर्वी खुबसुरत आणि वीरे दी वेडिंग सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. रजत अरोरा हे या सिनेमाची पटकथा लिहित आहेत. याशिवाय सिनेमाचे निर्मातेही तेच आहेत. रितेशसोबत या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री असल्याचं बोललं जात आहे. 
या सिनेमाचं शुटिंग फेब्रुवारीमध्ये होणार होतं. पण करोनाचं प्रमाण वाढल्याने हे आता जुलैमध्ये होणार आहे. या सिनेमात रितेश लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखा साकारणार आहे. याशिवाय रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बायोपिकची तयारीही सुरु केली आहे. याशिवाय तो रॉनी स्क्रूवालांच्या सिनेमातही दिसणार आहे.

Recommended

Loading...
Share