‘ड्रीमगर्ल’ सिनेमातील अभिनेत्री रिंकू सिंग निकुंभचे करोनाने निधन

By  
on  

‘ड्रीम गर्ल’ या सिनेमात काम करणारी अभिनेत्री रिंकू सिंग निकुंभचं करोनाने निधन झालं आहे. काही दिवसापुर्वी तिला करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान तिचे निधन झाल्याचे समोर आले आहे.२५ मे ला रिंकूचा करोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला होता. रिंकूला आणखी काही आजार असल्यामुळे तिची प्रकृती खालावली आणि तिला आयसीयूमध्ये दाखल केलं गेलं. ‘ड्रीम गर्ल शिवाय ‘चिडियाघर’ आणि ‘बालवीर’ या दोन मालिकांमध्येही ती दिसली होती.

 

 

 

Recommended

Loading...
Share