PeepingMoon Exclusive: महाराष्ट्र पोलिसांनी पर्लला वैद्यकीय चाचणीसाठी नेलं, सोमवारी कोर्टात होणार सुनावणी

By  
on  

‘नागिन ३’ या मालिकेतून लोकप्रियता मिळालेला अभिनेता पर्ल वी पुरीला मुंबई पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. 

एका तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने अभिनेता पर्लला (POSCO) ‘पोस्को॓’अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिस पर्लला आता वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जात आहेत. तसंच आत्ता पुन्हा आणखी एक ताजी बातमी या प्रकरणासंदर्भात समोर येत आहे ती म्हणजे पर्लला वसई कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. 

पर्लवर 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बलात्कार केल्याचा आरोप आहे.

 

 

 

 

 

 

पिपींगमूनला सूत्रांनी दिलेल्या एक्सक्लुझिव्ह वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी पर्लची को-स्टार आपली 11 वर्षीय मुलगी व पतीसह सेटवर गेली होती. या अभिनेत्रीच्या मुलीला पर्लसोबत सेल्फी काढण्याची इच्छा होती. त्यानंतर ती पर्लकडे फोटो काढण्याची विनंती करण्यासाठी गेली. मग पर्ल तिला आपल्या व्हॅनिटी वॅनमध्ये घेऊन गेला. त्यानंतर पर्ल ने तिचा विनयभंग व बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यानंतर ती अभिनेत्रीची मुलगी घरी गेली. तेव्हा तिच्या वागण्यातला फरक पालकांना जाणवला. ती काहीच बोलत नव्हती. खात नव्हती. तिला जेव्हा खुप खोदून खोदून विचारण्यात आलं तेव्हा झाला प्रकार तिने आई-वडिलांना सांगितला. आधी त्यांचा विश्वास बसत नव्हता. पण मेडीकल रिपोर्ट्समध्ये ते सिध्द झालं आणि त्यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी पोलिसांत एफआयआर दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्वरितच पर्लला त्याच्या ्अंबोलीतील घरातून अटक केली.

Recommended

Loading...
Share