PeepingMoon Exclusive: नीरज पांडेने 'पुथिया नियमम तर रमेश तौरानी ने 'अरण्य कांडम’ रिमेकचे हक्क घेतले

By  
on  

सध्या दाक्षिणात्य सिनेमाच्या रिमेकचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये जोरात सुरु आहे.  अजय देवगन ने दिल राजू सोबत तमिळ क्राईम कोर्टरूम ड्रामा 'नंदी' बनवण्याचा निर्णय घेतला आहे. तर बोनी कपूर यांनी नुकताच खुलासा केला की ते मल्याळम  हिट पॉलिटिकल ड्रामा वन चा हिंदी रिमेक बनवणार आहेत. 

 

पीपिंगमूनला मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, आणखी दोन सिनेमे रिमेकसाठी तयार आहेत. नीरज पांडे ने 2016 मध्ये आलेल्या क्राईम ड्रामा 'पुथिया नियमम ' चे रीमेक राइट घेतले आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, नीरज खुप दिवसापासून या रिमेकच्या विचारात होते. या सिनेमा फॅमिली आणि थ्रिलरचं परफेक्ट कॉम्बिनेशन असणार आहे. या स्क्रीप्टवर काम सुरु झालं आहे. एक कथकली नृत्यांगनेच्या रिवेंज स्टोरीवर हा सिनेमा बेतला आहे. 

नीरजचा हा तिसरा दाक्षिणात्य रिमेक आहे. यापुर्वी ते इश्क  आणि विक्रम वेधाच्या रिमेकवर काम करत आहेत. यानंतर रमेश तौरानी यांनी 'अरण्य कांडम’चे राईट्स घेतले आहेत. तौरानी लवकरच यावर काम सुरु करणार असल्याचं बोललं आहे.

Recommended

Loading...
Share