PeepingMoon Exclusive: 'नेटफ्लिक्स'च्या एडव्हेंचर रिएलिटी शोमधून रणवीर सिंह करतोय ओटीटी डेब्यू

By  
on  

तुम्ही जी बातमी वाचताय ती आजच्या दिवसातील सर्वात मोठी बातमी आहे. बॉलिवुडचा सर्वात तरुण सुपरस्टार आणि एनर्जी मॅन रणवीर सिंह हा आपल्या  ओटीटी डेब्यूसाठी सज्ज झाला आहे. पिपींगमून डॉट कॉमला एक्सक्ल्युझिव्हरित्या मिळालेल्या माहितीनुसार सर्वात  प्रसिध्द ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने रणवीरला आपल्या एका एक्शने भरपूर अशा एडव्हेंचर्स रिएलिटी शोसाठी साईन केलं आहे. करोना महामारीमुळे मनोरंजनाचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजेच सिनेमागृहे बंद असतानाच रणवीरसारख्या ए लिस्टर अभिनेत्याने ओटीटीची वाट धरली आहे यात नवल नक्कीच नाही. पण इतर सेलेबपेक्षा रणवीरने आपल्या धमाकेदार डेब्यूसाठी रिएलिटीशोची निवड केली आहे, हे वाखाणण्याजोगं नक्कीच आहे. 

नेटफ्लिक्सच्या या आगामी प्रोजेक्टची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण आमच्यापर्यंत अशीसुध्दा माहिती आलीय की, या शोमध्ये रणवीर अनेक अवघड आणि खतरनाक स्टंट  करताना पाहायला मिळणार आहे. यावरुन असं दिसतंय, रोहित आपला सिंबा सिनेमाचा दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या पावलावर पाऊल टाकतोय. रोहित सध्या एक्शन टीव्ही रिएलिटी शो 'खतरों के खिलाड़ी' होस्ट करतो आहे. रणवीर लवकरच आपल्या तारखा आणि लोकेशन लॉक झाल्यानंतर या कार्यक्रमाच्या शूटींगचा श्रीगणेशा करेल, हा भारतातील सर्वात मोठा नॉन-फिक्शन नेटफ्लिक्स शो असणार आहे. खुप मोठ्या बिग बजेट प्रमाणावर हा शो चित्रित होणार आहे. तसंच लवकरच या वेब शोची अधिकृत घोषणा होईल अशी आशा आहे. 

 

 

 

याचदरम्यान रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रणवीरला यशराज फिल्म्सच्या जयेशभाई जोरदार आणि  रोहित शेट्टीच्या सर्कसची आतुरता लागली आहे. तसंच तो करण जोहरच्या आगामी प्रोजेक्टमध्येसुध्दा काम करतोय. यात तो आपली गली बॉयची को-स्टार आलिया भट सोबत रोमान्स करताना पाहायला मिळेल. तसंच जोया अख्तरच्या एका गॅंगस्टर ड्रामा असलेल्या आगामी सिनेमात रणवीर आणि कतरिना् कैफची जोडी दिसू शकते. परंतु या प्रोजेक्टबाबत अद्याप कुठलीच सविस्तर माहिती नाही. 

Recommended

Loading...
Share