Peepingmoon Exclusive : शासकीय इतमामात होणार ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार , करोना प्रोटोकॉलचं होणार पालन

By  
on  

बॉलिवूडचे  ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.दिलीप सहाब यांना संपूर्ण सन्मानात आणि शासकीय इतमामात अंतिम निरोप देण्यात येणार आहे. सांताक्रूझ येथील बाबा कसाई कब्रिस्तान येथे त्यांचं दफन करण्यात येणार आहे. यावेळी करोना काळातील नियमांचं तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. 

दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्या कारणाने जून महिन्यात रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. यावेळी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटोदेखील शेअर करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. उपचारानंतर पाच दिवसांनी दिलीप कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

Recommended

Loading...
Share