By  
on  

रणवीर सिंगने करण जोहरच्या 'तख्त' च्या ऐवजी 'यशराज फिल्म्स'च्या 'जयेशभाई जोरदार' सिनेमाला दिलं प्राधान्य?

रणवीर सिंग सध्या '83' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं शूटिंग संपल्यावर रणवीर कारण जोहरच्या 'तख्त' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार होता. परंतु नुकतंच 'यशराज फिल्म्स'ने आपल्या आगामी 'जयेशभाई जोरदार' या सिनेमाची घोषणा केली. तसेच रणवीरने सुद्धा आपल्या ट्विटरवरून 'जयेशभाई जोरदार'च्या स्क्रिप्टची तारीफ केली. त्यामुळे सर्वजण चकीत झाले आहेत. 

रणवीर 'तख्त' या सिनेमात 'दारा शिकोह' ही व्यक्तिरेखा साकारत आहे. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार '83' आणि 'तख्त' या सिनेमांच्या शूटिंगदरम्यान चार महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे रणवीर या चार महिन्यांमध्ये 'जयेशभाई जोरदार'चं शूटिंग करणार आहे. 

 

या सर्वात कुठेही वाद, मतभेद यांचा समावेश नाही. आदित्य चोप्रा आणि करण जोहर हे अत्यंत चांगले मित्र आहेत. त्यामुळे आता 'जयेशभाई जोरदार' आणि 'तख्त' यांदरम्यान रणवीर कशाची निवड करतोय करतोय हे पाहणं कुतूहलाचा विषय आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive