Exclusive: आदित्य ठाकरे नाहीत दिशा-टायगरच्या स्टोरीमधील व्हिलन

By  
on  

बॉलिवूडमधील सतत लाईमलाईटमध्ये असलेलं कपल म्हणजे दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ. या कपलच्या ब्रेक अप- लिंक अप्सच्या चर्चा सतत होत असतात. पण सध्या मात्र मामला काहीसा वेगळा आहे. यावेळी दिशा-टायगरचं खरंच ब्रेक झालं असल्याचं समोर आलं आहे. पण पीपिंगमूनला समजलेलं सत्य काहीसं वेगळंच आहे. दिशा आणि टायगरच्या ब्रेक अपसाठी आदित्य ठाकरे जबाबदार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

पण पीपिंगमूनच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांच्या नात्याला ग्रहण लागण्यामागे आदित्य ठाकरेचा अजिबात हात नाहीये. टायगर आणि दिशा यांचं नातंच मुळी ‘इन अ‍ॅण्ड आउट’ होतं. त्यामुळे दोघांपैकी एकानेही या नात्यात अडकून पडणं बंधनकारक नव्हतं. त्यामुळे दिशा आणि टायगर यांच्या ब्रेकअपचा त्यांना फारसा त्रास होईलच असं नाही. दोघांपैकी एकजण या नात्यातून बाहेर येऊ इच्छित असला तरी नक्की टायगर की दिशा यापैकी कोण हे नक्की नाही.  

Recommended

Loading...
Share