EXCLUSIVE: आदित्य पंचोलीवर मुंबई पोलिसांनी दाखल केला बलात्काराचा गुन्हा

By  
on  

अभिनेता आणि निर्माता आदित्य पंचोली वर मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईमधील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये एका अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीवर बॉलीवूड अभिनेता-निर्माता आदित्य पंचोली विरुद्ध FIR दाखल केली आहे. 

याआधी अभिनेत्रीने याबाबतीत सांगितलं होतं की, आदित्य पंचोलीने १७ वर्षांची असताना तिच्यावर रेप केला होता. त्यावेळी या अभिनेत्रीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आदित्यला पोलिसांनी वॉर्निंग देऊन सोडून दिलं होतं. 

आदित्य पंचोलीने २०१५ मध्ये संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव मस्तानी' सिनेमात भूमिका केली होती. 

Recommended

Loading...
Share