EXCLUSIVE: तरुणींनो नाराज होण्याची अजिबात गरज नाही; विक्की कौशल या अभिनेत्रीला डेट करत नाही

By  
on  

काही दिवसांपूर्वी तरुणाईचा लाडका अभिनेता विक्की कौशल आणि 'बियॉन्ड द क्लाउड्स' ची अभिनेत्री मालविका मोहनन हे एकमेकांना डेट करत असल्याची खबर सिनेवर्तुळात चर्चेत होती. विक्कीची तरुणींमध्ये खूप क्रेझ आहे. परंतु या बातमीमुळे विक्कीवर प्रेम करणाऱ्या तरुणींचं हृदय तुटलं होतं. 

परंतु विक्कीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पिपिंगमुनला मिळालेल्या बातमीनुसार, विक्की आणि मालविका हे दोघे चांगले बालपणापासूनचे मित्र आहेत. या दोघांचे वडील हिंदी सिनेमांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. हे दोघं एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखत असल्याने दोघांच्या कुटुंबाचे घनिष्ट संबंध आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

पिपिंगमुनला मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही कलाकार एकमेकांना डेट करत नसून त्यांच्यात भाऊ-बहिणीचं नातं आहे. इतकंच नव्हे तर हे दोघं एकमेकांना राखी बांधतात. मालविका आणि विक्की एकमेकांचे खूप चांगले मित्र असून त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवण्यास आवडतं. परंतु त्यांच्यात मैत्रीपलीकडे आणखी काही नाही. 

हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर विक्कीचं नाव कतरीना कैफ आणि भूमी पेडणेकरशी जोडलं जात होतं. विक्कीने अल्पावधीत बॉलीवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.  'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'  सिनेमामुळे विक्कीचा 'जोश' अजून 'हाय' झाला. विक्की सध्या 'सरदार उधम सिंग' आणि 'सॅम माणकेशा' यांच्या बायोपिकवर काम करत आहे. विक्की आणि मालविका रिलेशनशिपमध्ये नसल्यामुळे विक्कीच्या फिमेल फॅन्सना नक्कीच आनंद झाला असेल.

 

Recommended

Loading...
Share