Exclusive: जोरदार पावसाचा अक्षय कुमारलाही फटका, लंंडन ट्रीपला झाला उशीर

By  
on  

मुंबईमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहेच. पण सेलिब्रिटीही पावसाच्या तडाख्यातून सुटलेले नाहीत. खिलाडी अक्षय कुमारलाही पावसाचा असाच फटका बसला.

अक्षय ट्वींकल आणि नितारा सोबत लंडनला जाण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचला खरा पण तुफान पावसामुळे त्याला उड्डाण रद्द करावं लागलं. अक्षयने नुकतंच ‘सुर्यवंशी’चं शुटिंग संपवलं आहे. आता तो एक महिना सुट्टी घेऊन लंडनमध्ये पोहोचणार होता. पण पावसामुळे त्याला प्लॅन एकदिवस पुढे ढकलावा लागला

अक्षय लंडनला जाऊन तिथे होणा-या भारत बांग्लादेश मॅचचा आनंद घेणार आहे.

अक्षयच्या सततच्या लंडनवारीचं एक खास कारण म्हणजे अक्षयचा मुलगा आरव हा लंडनमध्ये शिकत आहे. त्यामुळे अक्षय परिवारासह लंडनमध्ये सुट्टीचं नियोजन करत असतो.

Recommended

Loading...
Share