EXCLUSIVE: कॉमेडी किंग कपिल शर्माला बसला ६ करोडचा फटका? जाणून घ्या

By  
on  

 आधुनिक ऑटोमोटिव डिजाइनसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी बँकेचं कर्ज न चुकवल्यामुळे आर्थिक संकटात सापडली आहे. ही खबर मागील काही दिवसांपूर्वी सर्वत्र चर्चेत होती. कर्ज न फेडल्याने संबंधित बँक या गाडी डिझाईन करणाऱ्या कंपनीची संपत्ती जप्त करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या प्रकरणाची झळ भारतामधील लोकप्रिय स्टैंड-अप कॉमेडियन कपिल शर्माला बसली आहे. 

पिपिंगमुनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, कपिल शर्माने या कंपनीच्या माध्यमातून एक वैनिटी बुक केली होती.आपली वैनिटी इतरांपेक्षा हटके दिसेल यासाठी कपिलने खास आकर्षक डिझाईन सुद्धा ठरवली होती. परंतु गाडी बनवणारी ही कंपनी आर्थिक संकटात सापडल्याने कपिल शर्माला ६ करोडचं नुकसान सहन करावं लागत आहे. परंतु अजूनही हि कंपनी आणि कॉमेडी किंग कपिल शर्मा या प्रकरणाविषयी समाधानकारक तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहेत. 

अजून तरी याबाबतीत कोणतीही गोष्ट उचित घडत नाही. कारण ही कंपनी ज्या आर्थिक संकटात सापडली आहे त्या प्रकरणाची आर्थिक बाजू फार मोठी आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या आर्थिक संकटातून एखादा चमत्कारच कपिलला वाचवू शकेल. 

Recommended

Loading...
Share