EXCLUSIVE: 'मैने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीच्या नवऱ्याला या कारणासाठी झाली अटक

By  
on  

'मैने प्यार किया' या लोकप्रिय सिनेमातील अभिनेत्री भाग्यश्रीचा नवरा हिमालय दसानी याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 

सट्टेबाजी आणि जुगार  करत असल्याचा आरोपाखाली हिमालयाला आंबोली पोलिसांनी हिमालयला अटक केली आहे. 

मूळची सांगलीची असलेल्या भाग्यश्री पटवर्धनने बॉलीवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या नवऱ्याला अटक झाल्यामुळे भाग्यश्री पुन्हा चर्चेत अली आहे. 

मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अंधेरी लोखंडवाला येथील एका फ्लॅटमध्ये रेड टाकली होती. या आलिशान फ्लॅटमध्ये सट्टेबाजी आणि जुगाराचा अड्डा चालवला जात होता. मुंबई पोलिसांनी या फ्लॅटमधून २१ सट्टेबाजांना आणि जुगारींना अटक केली. या फ्लॅटमध्ये अड्ड्याच्या मालकाच्या नावाच्या जागी हिमालय दासानीचं नाव होतं. 

लोखंडवाला येथील एका अपार्टमेंटमध्ये सोशल क्लबच्या नावाखाली पोकर क्लब चालू असल्याची खबर मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या अपार्टमेंटमध्ये रेड टाकून कार्ड्स, पोकर साइंस आणि लाखो रुपयांची कॅश जप्त केली.  

पुढे या फ्लॅटची देखभाल करणाऱ्या दीपक गुप्ताला पोलिसांनी अटक केली. दीपकनेच पोलिसांसमोर खुलासा केला की, अभिनेत्री भाग्यश्रीचा नवरा हिमालय दासानी  आणि त्याचा पार्टनर करण ठक्कर हा जुगाराचा अड्डा चालवत आहेत. त्यानंतर पोलिसांनी बराच वेळ हिमालयशी याप्रकरणी चौकशी केली. आणि चौकशीअंती पोलिसांनी हिमालयला अटक केली. 

Recommended

Loading...
Share