By  
on  

Exclusive: आयुष्मानच्या आगामी ‘शुभमंगल ज्यादा सावधान’मध्ये झळकणार ही टिव्ही अभिनेत्री

टिव्ही अभिनेत्री सिनेमांमध्ये झळकण्याचा सिलसिला बॉलिवूडला नवा नाही. मौनी रॉय, राधिका मदान, मृणाल ठाकूर ही त्यातली काही महत्त्वाची नावं. आता आणखी एका अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये चमकण्याची लॉटरी लागली आहे. अभिनेत्री पंखुरी अवस्थीला आयुष्मान खुरानासोबत ‘शुभमंगल ज्यादा सावधान’मध्ये झळकण्याची संधी मिळाली आहे.

शुभमंगल सावधान या सिनेमाचा ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ हा सिक्वेल आहे. 
पंखुडीने आतापर्यंत अनर्थ (2002), अक्सर 2 (2017) या सिनेमांसहित अनेक व्हिडियो गाण्यात काम केलं आहे. हा सिनेमा पुढील वर्षीच्या व्हॅलेंटाईनला रिलीज होत आहे. यात आयुष्मान समलैंगिक मुलाची भूमिका साकारताना दिसत आहे. या सिनेमाच्या प्रीक्वेलमध्ये भूमी पेडणेकरने काम केलं होतं. आता पंखुडी कय धमाल करते ते लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive