Exclusive: शाहिद कपूरचा भाव वाढला, कबीरसिंहच्या यशाच्या परिणाम

By  
on  

शाहिद कपूरला कबीर सिंहच्या रुपाने ब-याच दिवसांनी यशाची चव चाखायला मिळाली. शाहिदने आपण अजूनही सुपरस्टारच्या रेसमध्ये आहोत हे दाखवून दिलं. शाहिद आणि कियाराची केमिस्ट्रीही या सिनेमात चांगली दिसली. तेलुगु सिनेमा अर्जुन रेड्डीचा रिमेक असलेल्या या सिनेमाने अत्यंत चांगला बिझनेस केला आहे. या सिनेमाचा आतापर्यंतचा बिझनेस 226.11 कोटींचा बिझनेस केला आहे. हा सिनेमा लवकरच 250 कोटींचा व्यवसाय केला आहे. यासोबतच कबीर सिंह भारतातील टॉप कमाई करणा-या 15 सिनेमांच्या यादीत पोहोचला आहे.

 
पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार कबीरसिंहनंतर शाहिदने त्याची फी वाढवली आहे. शाहिदने पुढील सिनेमासाठी 30 कोटी रुपये आकारायचे ठरवले आहेत. शाहिदची ब्रॅण्ड व्हॅल्यूदेखील या यशाने वाढेल यात शंका नाही. या सिनेमात शाहिदची प्रीतीसोबतच्या हिंसक वागणुकीला उत्तेजन दिल्याचा आरोपही दिग्दर्शक संदीप वांगा यांच्यावर झाला. यावर संदीप म्हणतात, ‘यात केवळ भाव व्यक्त करण्याचं प्रयोजन आहे.’

Recommended

Loading...
Share