EXCLUSIVE: 'दोस्ताना 2' मध्ये बॉबी देओलचा मुलगा आर्यमन झळकणार नाही

By  
on  

काही दिवसांपूर्वी करण जोहरने आपल्या ट्विटरवरुन 'दोस्ताना 2' ची घोषणा केली होती. या सिनेमाच्या पहिल्या भागात जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि प्रियंका चोप्रा हे प्रमुख भूमिकेत झळकले होते. आता या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या सिनेमात दुसऱ्या लीड रोलमध्ये बॉबी देओलचा मुलगा आर्यमन देओलच्या नावाची सर्वत्र चर्चा होती. 

परंतु आता पिपिंगमुनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह बातमीनुसार 'दोस्ताना 2'मध्ये दुसऱ्या लीडरोलसाठी अजून कोणाचा विचार केला गेला नाही. या भूमिकेसाठी फिल्ममेकर्स नव्या चेहऱ्याच्या शोधात आहेत. लवकरच करण जोहर आपल्या अनोख्या अंदाजात या सिनेमातील तिसऱ्या कलाकाराची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. 

 

सूत्रांच्या माहितीनुसार या सिनेमात कार्तिक आणि जान्हवी भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच अजून एक हटके माहिती समोर आली आहे, की सिनेमात या दोघांना एकाच व्यक्तीवर प्रेम असतं. त्यामुळे 'दोस्ताना 2' बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Recommended

Loading...
Share