Exclusive: 'कंगना, डोकं थोडं फ्रिजमध्ये ठेव, आणि थंड हो' मीडियाच्या 'त्या' प्रकरणावर राखी सावंतने दिला कंगनाला सल्ला

By  
on  

काही दिवसांपूर्वी 'जजमेंटल है क्या' सिनेमाच्या सॉंग लाँचवेळी कंगनाचं एका पत्रकरासोबत भांडण झालं. त्यावेळी कंगनाने त्या पत्रकाराला जाहीरपणे खडे बोल सुनावले. आणि इतकंच नाही तर कंगनाने त्या पत्रकारावर आरोपांच्या फैरी झाडत भर इव्हेंटमध्ये खरपूस समाचार घेतला. कंगनाच्या या पवित्र्यामुळे पत्रकार चांगलेच संतापले. कंगनाने जर माफी मागीतली नाही तर तिच्या सिनेमांच्या प्रमोशनवर बहिष्कार टाकू असा खणखणीत इशारा पत्रकारांनी दिला आहे. 

कंगनाच्या या संपूर्ण प्रकरणावर पिपिंगमुनने एक्सक्लुझिव्हली ड्रामा क्वीन राखी सावंतशी बातचीत केली. यावर बोलताना राखी दिलखुलासपणे म्हणते,''कंगना, तू एक चांगली अभिनेत्री आहे. पण मी तुला एक सल्ला देऊ इच्छिते. तसं मी कोणाला जज करत नाही. पण जरा थंड हो. डोकं फ्रिजमध्ये ठेव. तू बेस्ट ऍक्टर आहेस. मीडियामध्ये अशी ताकद आहे जी कोणाच्या डोक्यावर मुकुट चढवू शकते तसेच तो उतरवूही शकते. तसेच कोणाला खुर्चीवर बसवू शकते. तर त्याच खुर्चीवरून पाडू सुद्धा शकते.''

 

तसंच राखी पुढे म्हणते ,''कंगना आणि रंगोली तुम्ही मीडियाशी 'पंगा' घेऊ नका.तुम्ही खूप हार्डवर्किंग गर्ल आहात. परंतु मीडियाशी पंगा घेऊ नका. मीडिया एखाद्याचं चांगलं कॅरेक्टर निर्माण करू शकते तसेच त्या कॅरेक्टरवर डाग सुद्धा पडू शकते.''

''तू पण मेंटल आहेस, मी पण मेंटल आहे. ही मीडिया सुद्धा मेंटल आहे. मला असं वाटतं की आपल्या सर्व मेंटल लोकांना उल्हसनगरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला मीडियाशी पंगा घायचा नाही. तुझी जजमेंटल है क्या खूप रॉकिंग असणारा आहे. पण मीडियाशी दुश्मनी करू नकोस मेरी जान! तुला माहितीय ना, आजच्या काळात मीडिया कोण आहे'', असा प्रेमळ आणि खट्याळ सल्ला राखीने कंगनाला दिला. 

आता कंगनाच्या या कृत्यावर नेमक्या कोणत्या प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Recommended

Loading...
Share