Exclusive: सुट्टीदरम्यान लंडन येथे सैफ अली खान आणि मुलगा इब्राहिममध्ये दिसलं स्पेशल बॉण्डिंग

By  
on  

नुकतंच अभिनेता सैफ अली खानची पूर्वपत्नी अमृता सिंह सारा अली खान आणि इब्राहिम या आपल्या दोन मुलांसोबत लंडन येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तर दुसऱ्या बाजुला सैफ अली खान कुटुंबासोबत वेळ काढून स्वतःच्या 'होम प्रोडक्शन'ची निर्मिती असलेला 'जवानी जानेमन' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. परंतु समर व्हॅकेशन असल्यामुळे सैफ अली खान कुटुंबासोबत वेळ घालवण्यास प्राधान्य देत आहेत. 

तसेच करीना कपूर सैफ-शर्मिलासोबत रणधीर कपूर, बबिता कपूर आणि करिश्माच्या दोन मुलांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. गेल्या रविवारी सैफने शूटिंगमधून एका दिवसाची सुट्टी घेऊन इब्राहिम या आपल्या मुलासोबत डिनरचा आस्वाद घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार,''सैफ आणि इब्राहिमला क्रिकेटची प्रचंड आवड आहे. खुपवेळेस सैफ आणि इब्राहीम या वडील-मुलाच्या क्रिकेटवरून गप्पा रंगतात. सैफला सुद्धा मुलाच्या या गोष्टीबद्दल अभिमान आहे.''

सैफ अली खानने यासंबंधी खुलासा केला,''खूप लोकांना वाटतं की इब्राहिम माझ्या व्यक्तिमत्वाविरुद्ध आहे. तर या लोकांना मी सांगू इच्छितो की ते खरं बोलतात. जर मी माझ्या मुलाएवढा उंच असतो तर...''

सैफ सध्या 'जवानी जानेमन' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच 'लाल कप्तान' या आगामी सिनेमात सैफ अली खान नागासाधुच्या हटके भूमिकेत झळकणार आहे. 

 

Recommended

Loading...
Share