Exclusive : जान्हवी-ईशानची जोडी पुन्हा एकत्र येणार , धर्मा प्रोडक्शन घेऊन येतोय एक नवा सिनेमा

By  
on  

सैराटच्या अधिकृत बॉलिवूड रिमेकमधून प्रेक्षकांच्या मनात धडक एन्ट्री करणा-या जान्हवी कपूर आणि  ईशान खट्टर या जोडीची खुप चर्चा रंगली. दोघांचीसुध्दा ऑफ स्कीन आणि ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यात खुप मजा येते. धर्मा प्रोडक्सन ह्या बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या प्रोडक्शनने या नव्या टॅलेंटसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला व त्याचं या दोघांनी सोनं केलं. आता पिपींगमूनच्या हाती आलेल्या एक्सक्लुझिव्ह वृत्तानुसार धर्मा प्रोडक्शन पुन्हा एकदा या धडक' जोडीला घेऊन एक रोमॅंण्टीक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. 

पुढील वर्षी  म्हणजेच  2020 साली धर्मा प्रोडक्शन बॅनरअंतर्गत अनेक मोठमोठे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण यात पुन्हा एकदा ते जान्हवी आणि ईशानच्या जोडीसोबत एक रोमॅंटीक थ्रीलर घेऊन येत आहेत.या आगामी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा बिजॉय नाम्बियार करणार आहेत. त्यांनी कारवॉं आणि वझीर सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केले आहे. 

Recommended

Loading...
Share