Exclusive: करण जोहर 'स्टुडंट ऑफ द इयर'ला वेब व्हर्जनमध्ये करणार लॉॆच

By  
on  

फिल्ममेकर करण जोहर नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण आणि 100 % मनोरंजनाची हमी देणारे प्रोजेक्ट घेऊन येतो. आता लवकरच प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन करण सज्ज झाला आहे. त्याची फ्रेंचायजी असलेल्या  'स्टुडंट ऑफ द इयर'ला तो वेबसिरीजच्या स्वरुपात लॉंच करण्याच्या पूर्ण तयारीत असल्याची एक्सक्ल्युझिव्ह माहिती पिपींगमून डॉट कॉमच्या हाती आली आहे. याला करण आपली नवीन डिजीटल कंपनी धर्माटिक एन्टरटेन्मेन्टद्वारे लॉंच करणार आहे. 

पिपींगमूनला याबद्दलसुध्दा माहिती मिळालीय ती म्हणजे, SOTY स्टार्स  वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा  आणि आलिया भट्ट यांच्यापासून सीक्वलचे स्टार्स टायगर श्रॉफ,अनन्या पांडे आणि तारा सुतारिया हे सर्व ह्या वेबसिरीजमध्ये झळकणार आहेत. पण यातील महत्त्वाचा ट्विस्ट हा असेल की या वेब शोची कथा,प्लॉट  आणि प्रस्तुती सिनेमापेक्षा वेगळी ठरेल. 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share