Exclusive: 'जिगरथंडा'च्या हिंदी रिमेकमध्ये राजकुमार राव आणि सैफ अली खान झळकणार प्रमुख भुमिकेत?

By  
on  

गाजलेला तामिळ सिनेमा 'जिगरथंडा' चा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मूळ सिनेमाचं प्रेक्षक आणि समीक्षकांडून खूप कौतुक झालं होतं. आता पिपिंगमूनला मिळालेल्या बातमीनुसार साजिद नाडियादवाला यांनी मूळ सिनेमाचे हक्क विकत घेतले आहेत. तसेच 'सोनचिडिया' या सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक चौबे या रिमेकचं दिग्दर्शन करणार आहेत. तसेच या सिनेमाच्या प्रमुख कलाकारांविषयी एक रंजक माहीती पिपिंगमून तुम्हाला देत आहे. 

सुत्रांच्या माहीतीनुसार या आगामी सिनेमात राजकुमार राव आणि सैफ अली खान प्रमुख भुमिकेत झळकणार आहेत. राजकुमार रावने या सिनेमात अभिनय करण्यासाठी होकार दिला आहे. सैफ अली खानसोबत या सिनेमासंबंधी अजुन बोलणी सुरु आहेत. 

या सिनेमात दोन हिरो कथेच्या केंद्रस्थानी आहेत. एका युवा फिल्म निर्मात्याला एक गुन्हेगारी सिनेमा बनवायची इच्छा असते. मुळ सिनेमात अभिनेता सिद्धार्थ आणि बाॅबीने अविस्मरणीय भुमिका साकारली होती.

Recommended

Loading...
Share