By  
on  

Exclusive: आलिया भट्टची जिवलग मैत्रीण आकांशा रंजन कपूरला करण जोहर करतोय लाँच

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टची जिवलग मैत्रीण आकांशा रंजन कपूरला करण जोहर एका आगामी वेबसीरिजमधून लाँच करत आहे. 'गिल्टी' असं या वेबसिरीजचं नाव आहे. ही वेबसिरीज लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून आकांशा अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. आकांशासोबत या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणीसुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. 

'मनमर्जियां', 'केदारनाथ', 'जजमेंटल है क्या' आदी सिनेमांचं पटकथालेखन करणाऱ्या कनिका धिल्लो यांनी ही वेबसिरीज लिहिली आहे. रुची नारायण या वेबसीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत. एका छोट्या गावातली मुलगी मोठ्या शहरात शिकायला येऊन तिचं आयुष्य कसं बदलतं, यावर या वेबसीरिजचं कथानक आधारलेलं आहे. आकांशा रंजन कपूर छोट्या शहरातल्या मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. 

आकांशा याआधी अंकित तिवारीच्या ‘तेरे दो नैना’ या सोलो सॉंग व्हिडिओमध्ये अपारशक्ती खुराणासोबत झळकली होती. आकांशाने 'गिल्टी'साठी रीतसर ऑडिशन दिली होती. आता आकांशा या वेबसीरिजमधून आपल्या अभिनयाची कशी छाप पाडते, हे पाहणं औत्सुक्याचा विषय आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive