By  
on  

Exclusive: कतरिना कैफची बहिण इझाबेलचा सिनेमा अडचणीत?

कतरिना कैफची लहान बहिण इझाबेल बाॅलिवुडमध्ये आगामी हिंदी सिनेमामधुन पदार्पण करत असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासुन चर्चेत होत्या. 'टाईम टु डान्स' सिनेमातुन इझाबेल बाॅलिवुडमध्ये पदार्पण करणार होती. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता सुरज पांचोली झळकणार होता. परंतु पिपिंगमुनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहीतीनुसार हा डान्स-ड्रामा आता अडचणीत आला आहे. 

स्टॅनले डी कोस्टा 'टाईम टु डान्स' सिनेमातुन बाॅलिवुडमध्ये दिग्दर्शक म्हणुन पदार्पण करणार आहेत. परंतु सिनेमा शुट झाल्यानंतर सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाबद्दल नाराजी व्यक्त केली. निर्मात्यांच्या या नाराजीमुळे स्टॅनली डी कोस्टा यांनी हा सिनेमा पुन्हा एकदा शुट केला. 

हा रिशुट झालेला सिनेमा निर्मात्यांनी पाहीला. परंतु स्टॅनले डी कोस्टा यांच्या कथा दाखवण्याच्या पद्धतीवर निर्माते असमाधानी होते. या सर्व गोष्टींमुळे सिनेमा डब्यात जाण्यापासुन वाचवावा म्हणुन एडीटींग टिम हरत-हेचे प्रयत्न करत आहे. गरज लागल्यास सिनेमातील काही प्रसंग पुन्हा शुट करण्यात येतील. 

या सिनेमात सुरज हा स्ट्रीट डान्सर तर इझाबेल एका बाॅलरुम डान्सरची भुमिका साकारत आहे. हा सिनेमा कागदावर छान झाला आहे परंतु स्क्रीप्टचं रुपातंर चित्रमाध्यमात करताना काहीतरी बिनसतं आहे. हा सिनेमा नृत्यावर आधारीत भारतामधील  भव्यदिव्य सिनेमा मानला जात आहे. आता हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? आणि इझाबेलचं पदार्पण आणखी किती लांबणीवर जाणार? या प्रश्नांची उत्तरं अजुनही गुलदस्त्यात आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive