Exclusive: शाहरुख खानचा मुलगा आर्यन दाक्षिणात्य सिनेमातून डेब्यू करणार या निव्वळ अफवाच

By  
on  

 

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आणि गौरी खान यांचा सुपुत्र आर्यन खान याने 'लायन किंग' मधील सिम्बाच्या हिंदी डब व्हर्जनमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या करियरची सुरुवात अनोख्या पद्धतीने केल्यामुळे आर्यनचं सर्वच स्तरांकडून कौतुक होत आहे. आर्यन लवकरच अभिनयात सुद्धा पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. परंतु हा कोणता बॉलीवूडचा सिनेमा नसून आर्यन साऊथच्या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे, अशा अफवा सध्या सगळीकडे चर्चेत आहेत.

आर्यन आगामी'हिरण्यकश्यपु' सिनेमात झळकणार असल्याच्या चर्चा सगळीकडे होत्या.'बाहुबली' प्रमाणे हाही सिनेमा भव्य दिव्य असणार आहे. तेलगूमधील प्रसिद्ध दिग्दर्शक गुणशेखर या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. परंतु या सिनेमातून आर्यन अभिनयात पदार्पण करणार आहे, या निव्वळ अफवा असल्याचं सिद्ध झालं आहे. 

पिपिंगमुनला मिळालेल्या एक्सक्लुसिव्ह माहितीनुसार सध्या तरी आर्यन कोणत्याही सिनेमातून अभिनयात पदार्पण करणार नाहीय. तसेच आर्यन जेव्हा सिनेमांमध्ये काम करेल तेव्हा त्याची सुरुवात साऊथ सिनेमातून नाही तर बॉलीवूडच्या सिनेमातून होईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यनला हिरण्यकश्यपु हा सिनेमा ऑफर झालेला नाही. तसेच आर्यनचे वडील शाहरुख खान बॉलीवूडमधले सुपरस्टार आहेत. तसेच आर्यनचा मार्गदर्शक करण जोहर'धर्मा प्रोडक्शन' तर्फे योग्य वेळी आर्यनला बॉलीवूडमध्ये लाँच करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे या कारणांमुळे  आर्यन साऊथ इंडस्ट्रीमधून पदार्पण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वडिलांचं वलय आणि करण जोहर सारख्या मार्गदर्शकाची साथ असताना आर्यन साऊथमध्ये पदार्पण करणारच नाही. 

'लायन किंग'च्या यशानंतर आर्यनचं सगळीकडून कौतुक झालं. त्यामुळे आता आर्यन कोणत्या सिनेमातून किंवा कोणत्या माध्यमातून अभिनयाचं पदार्पण करणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 

Recommended

Loading...
Share