By  
on  

 Exclusive: आनंद एल रायच्या आगामी लव्ह ट्रँगल मध्ये धनुष आणि सारा अली खान सोबत हृतिक रोशनची महत्वपुर्ण भुमिका

2018 मध्ये शाहरुख खानची प्रमुख भुमिका असलेला 'झीरो' हा आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा सिनेमा. 'झीरो' नंतर आनंद नव्या सिनेमाच्या तयारीला लागले आहेत. हा सिनेमा लव्ह ट्रँगल असणार आहे. 

या लव्ह ट्रँगलमध्ये अभिनेता धनुष आणि अभिनेत्री सारा अली खान हे प्रमुख भुमिकेत झळकणार आहेत. यांच्यासोबत तिसरा कलाकार कोण हे अद्याप गुलदस्त्यात होते. तर पिपिंगमुनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह बातमीनुसार अभिनेता हृतिक रोशन या सिनेमात महत्वपुर्ण भुमिकेत झळकणार आहे. या सिनेमाचं बहुतांश शुटींग उत्तर भारतात केलं जाणार आहे. 

हृतिकच्या 'सुपर 30' ने बाॅक्स ऑफीसवर यशस्वी कमाई केली. तसेच ऑक्टोबर मध्ये हृतिक टायगर श्राॅफसोबत 'वाॅर' सिनेमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धनुष सुद्धा 'षमिताभ'नंतर खुप महिन्यानंतर या सिनेमातुन बाॅलिवुडमध्ये कमबॅक करणार आहे. सारा अली खानने नुकतंच कार्तिक आर्यनसोबत 'लव्ह आज कल 2' ची शुटींग संपवली आहे. त्यानंतर लगेचच तिने वरुण धवन सोबत 'कुली नं. 1' च्या शुटींगला सुरुवात केली आहे. आता या तिघांची जोडी कोणती धमाल करणार हे लवकरच प्रेक्षकांना कळून येईल. 

Recommended

PeepingMoon Exclusive