By  
on  

Exclusive: अक्षय कुमार नाही दिसणार अजित डोवाल यांच्या व्यक्तिरेखेत

सध्या अक्षय कुमारचे सितारे चांगलेच तेजीत आहेत. आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण खुद्द अक्षयनेच हे वृत्त फेटाळलं आहे. अक्षयने पीपिंगमूनशी बोलताना या वृत्ताचा इन्कार केला. खरंतर अक्षय आणि नीरजमध्ये ‘पॅडमॅन’ आणि ‘अय्यारी’ एकत्र रिलीज करण्यावरून तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे हे दोघं एकत्र येणार ही बातमी चांगली असल्याचं बोललं जात होतं. पण त्यात काही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. 

हा सिनेमा ‘बेबी’ सिनेमाच्या पार्श्वभूमीवर बनवला जाणार असल्याचं समोर आलं होतं. पण नीरजला अजयसोबतची ‘चाणक्य’ आधी संपवायची होती. त्यामुळे या प्रोजेक्टची अनिश्चितता अधिकच वाढली आहे. अक्षय सध्या ‘मिशन मंगल’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive