By  
on  

Exclusive: 2020च्या ईदच्या मुहुर्तावर बॉक्सऑफिवर होणार मेगा क्लॅश सलमान, जॉन आणि अक्षयचा सिनेमा एकत्र रिलीज?

महत्त्वाचे सण आणि सुट्ट्यांच्या दिवशी बॉलिवूडचे महत्त्वाचे सिनेमे रिलीज होत असतात. पुढील वर्षीच्या ईदलाही असाच काहीसा योग जुळून येताना दिसत आहे. या ईदला अक्षयचा ‘लक्ष्मीबाँब’ हा सिनेमा, सलमानचा आणखी एक सिनेमा यांच्यासोबत जॉनचा ‘मुंबई सागा’ हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे. असं झालं तर हा बॉक्स ऑफिसचा मेगा क्लॅश असेल यात शंका नाही.

मुंबई सागा या सिनेमात जॉन अब्राहम, काजल अग्रवाल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, इमरान हाशमी, रोहित रॉय, प्रतीक बब्बर आणि गुलशन ग्रोवर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. खरं तर या आधी ईदला अक्षय कुमारचा सुर्यवंशी सिनेमा रिलीज होणार होता. पण अक्षय आणि रोहीतने समंजसपणा दाखवत या सिनेमाची रिलीज डेट बदलली होती. पण सलमानचा ‘इन्शाअल्लाह’ हा सिनेमा कॅन्सल झाला. त्यामुळे अक्षयने त्याच्या आगामी ‘लक्ष्मी बाँब’ या सिनेमाची घोषणा केली.

पण सलमान ही लाडकी तारीख सोडण्यास तयार नाही. त्यामुळे तो ही या तारखेला सिनेमा रिलीज करणार असल्याचं समजत आहे. त्यामुळे आता हे सितारे एकमेकांना क्लॅश करतात की सांमजस्याने मार्ग काढतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive