By  
on  

करण जोहरचे हे नवीन स्टुडंटस् झळकणार 'कॉफी विथ करण'मध्ये

दिग्दर्शक करण जोहर सध्या कॉफी विथ करण या त्याच्या शोमुळे बराच चर्चेत आहे. तुम्हाला सर्वांना माहितच असेल विविध हटके सेलिब्रिटी जोड्यांना शोमध्ये आमंत्रित करुन करण त्यांच्या मनातलं ओठांवर घेऊन येतो. त्यामुळे हा शो नेहमीच टीआरपीच्या रेसमध्ये सर्वोच्च क्रमांकावर असतो.

करणचा स्टुडंट ऑफ द इयर या सुपरहिट सिनेमाचा सिक्वल येतोय. आलिया भट, वरुण धवन आणि सिध्दार्थ मल्होत्रा यांनी पहिल्या भागातून प्रेक्षकांची मनं जिकल्यानंतर आता एक फ्रेश स्टारकास्ट या सिक्वलमध्ये पाहायला मिळणार आहे.

पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार लवकरच कॉफी विथच्या आगामी भागात करणचेच नवीन स्टुडंट हजेरी लावणार आहेत. स्टुडंट ऑफ द इयर 2 सिनेमात टायगर श्रॉफसोबतच चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या दोन नवोदित अभिनेत्री पदार्पण करत आहेत. त्यामुळेच करण आपल्या नवीन स्टुडंट्सकडून काय काय वदवून घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान टायगक श्रॉफ यापूर्वी आपले वडील जॅकी श्रॉफ यांच्यासोबत कॉफीच्या एका भागात उपस्थित होता. त्यामुळे त्याला हा शो नवीन नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive