By  
on  

Exclusive: 2020च्या ईदला सलमानचा ‘राधे’ येणार रसिकांच्या भेटीला

2020च्या ईदला सलमानचा इन्शाअल्लाह रिलीज होणार नाही समजल्यावर सलमानचे चाहते निराश झाले होते. पण भाईजान सलमान त्याच्या फॅन्सना कधीही निराश करत नाही. त्यामुळेच पुढील वर्षीच्या ईदला सलमान राधेला घेऊन भेटीला येत आहे. सलमानचा राधे हा सिनेमा 2020च्या ईदला रिलीज होत आहे. हा सिनेमा प्रभूदेवा दिग्दर्शित करत आहेत.

राधे हा सिनेमा सलमानचा ‘वॉण्टेड 2’ असल्याचं बोललं जात आहे. पण या सिनेमाला राधे हे टायटल दिलं आहे. याला कारण वॉण्टेड हा सिनेमा बोनी कपूर यांची निर्मिती होती. पण मलायका अर्जुन प्रकरणामुळे सलमान आणि बोनी कपूर यांचे संबंध फारसे चांगले नाहीयेत. त्यामुळेच वॉण्टेडच्या सिक्वेलचं नाव सलमानने वॉण्टेड 2’ न ठेवता राधे ठेवलं आहे.

सलमानसाठी ईद खुप लकी आहे. ट्युबलाईट वगळता ईद दिवशी रिलीज झालेले आजवर त्याचे सगळे सिनेमे हिट ठरले आहेत. अशा वेळी ‘दबंग 3’ ईदपर्यंत स्थगित करण्याऐवजी राधे रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सिनेमा दिवाळीपर्यंत फ्लोअर वर जाईल.

Recommended

PeepingMoon Exclusive