By  
on  

रणवीरची बहिण रितीका भवनानी वहिनी दीपिकाचं करणार ग्रॅण्ड पार्टी देऊन स्वागत

दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडचे बाजीराव व मस्तानी एकमेकांचे झाल्यापासून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्याच्यांवर चोहोबाजूंनी फक्त सुखाची बरसात होतेय. अशातच पिपींगमूनच्या हाती एक एक्सक्ल्युझिव्ह वृत्त आलं आहे. ते म्हणजे दीपिकाच्या नणंदबाई म्हणजेच रणवीरची बहिण रितीका भवनानी या नवविवाहित दाम्पत्यासाठी एक ग्रॅण्ड पार्टी देऊन स्वागत करणार आहे.

येत्या शनिवारी 24 नोव्हेंबरला रितीका भवनानी ग्रॅण्ड ह्यात येथे ही शानदार पार्टी भवनानी आणि पादुकोण कुटुंबियांसाठी आयोजित करतेय. फारच जवळच्या मित्रपरिवार आणि नातेवाईंकांना या खास पार्टीचं निमंत्रण असणार आहे. बॉलिवूडला या रितीकाच्या वेगळी पार्टी देण्याचं अजिबात आश्चर्य वाटणार नाही, कारण रितीका ही रणवीरच्या खुप जवळ आहे. मोठी बहिण असली तरी त्यांच्यातलं नातं हे अगदी मित्रत्त्वाचं आहे.

एका मुलाखतीत रणवीरने सांगितलं होतं तो रितीकाला, छोटी मॉं आणि आईला बडी मॉं म्हणतो. रक्षाबंधनलासुद्धा रणवीर रितीकासोबत हा सण खास साजरा करतो. जोपर्यंत स्वत: हातावरची राखी पडत नाही तोपर्यंत तो तिची राखी काढत नाही.

आता लाडक्या नणंदबाईंची ही पार्टी वहिनी दीपिकाला किती आवडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive