Exclusive: संदीप वांगाच्या आगामी क्राईम ड्रामा मध्ये झळकणार वरुण धवन आणि रणबीर कपुर?

By  
on  

ब्लाॅकबस्टर 'कबीर सिंग'चे दिग्दर्शक आपल्या पुढच्या सिनेमाची जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहे. खबर चर्चेत होती की संदीप वांगाच्या आगामी सिनेमात रणबीर कपुर झळकणार आहे. रणबीर कपुरला संदीप यांनी आगामी सिनेमाची स्टोरी सुद्धा ऐकवली होती. परंतु रणबीर कपुरला सिनेमात घेण्यासाठी संदिप यांना प्रतीक्षा करावी लागेल. कारण रणबीर आगामी 'ब्रम्हास्त्र' आणि 'शमशेरा'च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. 

पीपींगमून. काॅमला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह बातमीनुसार संदीप वांगा आगामी सिनेमात वरुण धवनला कास्ट करण्याच्या विचारात आहेत. सर्व गोष्टी घाईत होत असल्याने येत्या काही दिवसात संदीप वांगा आगामी सिनेमाची आणि त्यातील कलाकारांची अधिकृतरित्या घोषणा करतील. 

एका मुलाखतीत संदिप यांनी सांगीतलं होतं की त्यांना गुन्हेगारी विषयावरील एखादा सिनेमा करण्याची इच्छा आहे. तसेच आज हिंदी आणि तेलगु सिनेमात कोणताही फरक राहीला नाहीय. 'बाहुबली' आणि 'केजीएफ' सारख्या सिनेमांनी ही दरी मिटवली आहे, असं संदीप वांगाचं मत आहे.

Recommended

Loading...
Share