Exclusive: ठरलं तर! 'भूल भुलैया 2'मध्ये कार्तिक आर्यनची हिरोईन असणार अभिनेत्री कियारा अडवाणी 

By  
on  

'भूल भुलैया 2' मध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून कोण काम करणार याची चर्चा कित्येक दिवस सिनेवर्तुळात सुरु होती. अखेर पिपिंगमुनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह बातमीनुसार अभिनेत्री कियारा अडवाणी कार्तिकची हिरोईन म्हणून झळकणार आहे. दिग्दर्शक प्रियदर्शनच्या या हॉरर कॉमेडीमध्ये कियारा अडवाणीची वर्णी लागली आहे. 

मागील आठवड्यात सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या दोन अभिनेत्रींची नावं चर्चेत होती. परंतु या दोघीही सध्या आगामी प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त आहेत. सारा अली खान वरुण धवन सोबत 'कुली नंबर १' तसेच इम्तियाझ अली च्या 'लव्ह आज कल'च्या सिक्वेलमध्ये झळकणार आहे. 

१९ ऑगस्टला 'भूल भुलैया 2'चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला. या लूकमध्ये डोळ्यावर काळा चष्मा असलेला कार्तिक आर्यन साधू बाबांच्या वेशभूषेत पाहायला मिळत आहे. आता कार्तिक आणि कियाराची जोडी या सिनेमात कशी धमाल आणणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 

Recommended

Loading...
Share