Exclusive: 'मोगुल' नव्हे तर 'लाल सिंग चड्ढा' नंतर 'विक्रम वेधा'च्या हिंदी रिमेकमध्ये सैफ अली खान सोबत काम करणार आमिर खान

By  
on  

आमिर खान सध्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' च्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याचसोबत लाल सिंग चड्ढा नंतर आमिर खान 'मोगुल'च्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याची चर्चा होती. परंतु दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर झालेल्या #MeToo आरोपांमुळे आमिर खानने 'मोगुल' सोडला होता. परंतु अलीकडेच आपला निर्णय आमिरने बदलला आणि 'मोगुल' पुन्हा काम करणार असल्याचं सांगितलं. परंतु पिपिंगमुनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार 'लाल सिंग चड्ढा'चं शूटिंग झाल्यानंतर आमिर 'मोगुल' नव्हे तर तामिळ सिनेमा 'विक्रम वेधा' रिमेकच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 

'विक्रम वेधा' च्या रिमेकमध्ये आमीरसोबत सैफ अली खान सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात या रिमेकच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. विक्रम-वेताळ यांच्या लोककथांचा आधुनिक अवतार म्हणजे 'विक्रम वेधा'. 'विक्रम वेधा' या मूळ सिनेमात आर माधवन आणि विजय सेतुपती यांनी भूमिका साकारल्या होत्या. 

'दिल चाहता है' नंतर या सिनेमाच्या माध्यमातून १९ वर्षांनंतर सैफ अली खान आणि आमिर खान एकत्र एका सिनेमात झळकणार आहेत. आता आमिर आणि सैफ यांची जोडी 'विक्रम वेधा' च्या रिमेकमध्ये प्रेक्षकांना पुन्हा पसंत पडणार का हे पाहणं कुतूहलाचा विषय आहे. 

Recommended

Loading...
Share