By  
on  

Exclusive: कृती सेनॉनच्या हातून गेला हा थ्रिलर सिनेमा

कृती सेनॉन आता थ्रिलर सिनेमात दिसणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. राहुल ढोलाकिया या सिनेमाची निर्मिती करणार होते. पण हा सिनेमा आता थंडबस्त्यात गेला आहे. हा सिनेमा बंद होण्याचं कारण म्हणजे कृती मॅच न होणा-या तारखा. कृती या सिनेमाला वेळ देऊ शकत नसल्याने हा प्रोजेक्ट बंद झाला आहे. त्यामुळे कृतीला थ्रिलर सिनेमात पाहू इच्छिणा-यांची निराशा झाली आहे. 

 

राहुलसोबतचा हा सिनेमा स्टार्ट टू एण्ड शेड्युलमध्ये असणार होता. पण कृतीने या सिनेमा ऐवजी दिनेश विजान यांच्या सिनेमाला तारखा दिल्या आहेत. त्यामुळे हा सिनेमा आता रिलीज व्हायच्या शक्यता धुसर आहेत. दुसरीकडे राहुल ढोलाकिया यांनीही दुस-या सिनेमासाठी काम सुरु केलं आहे. राहुल ढोलाकिया यांचा हा सिनेमा अ‍ॅक्शन ड्रामा असल्याचं बोललं जात आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive