By  
on  

Exclusive: तेलगु सुपरस्टार विजय देवराकोंडा डिसेंबरमध्ये करणार बाॅलिवुड पदार्पण

'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवराकोंडाची बाॅलिवुडमध्ये प्रचंड क्रेझ आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये अशी सुद्धा खबर होती की विजय देवराकोंडा 'धर्मा प्राॅडक्शन'च्या आगामी हिंदी सिनेमामधुन बाॅलिवुडमध्ये दमदार पदार्पण करत आहेत. परंतु याबाबतीत कोणतीही निश्चित माहीत नाही. पण पिपिंगमून तुम्हाला याचविषयी एक महत्वाची माहीती देणार आहे. 

पिपिंगमूनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहीतीनुसार विजय देवराकोंडा पुढच्या महिन्यात डिसेंबर पासुन हिंदी सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करणार आहे. हा सिनेमा 'धर्मा प्राॅडक्शन'चा नाही. हे खरं आहे की, विजय देवराकोंडा आणि करण जोहर या दोघांमध्ये आगामी सिनेमाविषयी बोलणी चालु आहेत. परंतु विजयचा आगामी हिंदी सिनेमा हा धर्मा प्राॅडक्शनचा नाही हे मात्र निश्चित. 

 

2017 साली विजय देवराकोंडाच्या 'अर्जुन रेड्डी' सिनेमामुळे या अभिनेत्याची सर्वत्र चर्चा झाली. परंतु नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहीद कपुरच्या 'कबीर सिंग' या सिनेमामुळे जो विजयच्याच 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक होता, विजय देवराकोंडा हे नाव पुन्हा सर्वत्र चर्चेत आलं. त्यामुळे आता लवकरच बाॅलिवुडच्या सिनेमातुन विजय देवराकोंडा रेड कार्पेटवर दिसला तर आश्चर्य वाटायला नको. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive