Exclusive: राजकुमार हिरानी की एटली? शाहरुख पडला संभ्रमात

By  
on  

शाहरुख झिरोनंतर कोणत्याही सिनेमातून रसिकांच्या समोर आला नाहीये. त्यामुळे त्याचा आगामी सिनेमा कोणता असेल याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. बादशाह शाहरुख खानचे फॅन्स त्याच्या 54व्या वाढदिवसानिमित्त नव्या सिनेमाची घोषणा होईल याकडे आशा लावून बसले होते. पण यावेळी शाहरुखने कोणतीही नवीन घोषणा केली नाही.

 

 

सध्या शाहरुख समोर राजकुमार हिरानी आणि दक्षिणी निर्माता एटली यांच्या सिनेमाचे पर्याय आहेत. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख या दोन्ही सिनेमांच्या निवडीबाबत संभ्रमात आहे. राजकुमार हिरानींचा सिनेमा कॉमेडी आहे. तर एटलीचा सिनेमा एक अ‍ॅक्शन मसालापट असणार आहे. एटलीचा हा सिनेमा प्रसिद्ध ‘बिगिल’या तामिळ सिनेमाचा रिमेकदेखील असू शकतो.

 

 

‘TED Talk season 2 च्या लाँच दरम्यान शाहरुखने सांगितलं होतं की, मी विचार करण्यासाठी थोडा वेळ घेत आहे. काही स्क्रिप्टवर कामही सुरु आहे. मी स्वत:च याची घोषणा करेन. आता शाहरुख कोणता निर्णय घेतो याकडे फॅन्सचं लक्ष लागून राहिलं आहे.

Recommended

Loading...
Share