#Exclusive: टीव्ही स्टार विशाल जेठवाला बॉलिवुड ब्रेक, 'मर्दानी 2' मध्ये रंगवतोय खलनायक

By  
on  

यशराज फिल्मसने जेव्हापासून क्राईम थ्रिलर 'मर्दानी 2' ची घोषणा केली तेव्हापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. हिचकीनंतर पुन्हा राणीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर झाले आहेत. शिवानी शिवाजी रॉय या व्यक्तिरेखेतून राणीने 2014 साली प्रदर्शित झालेल्या मर्दानीमधून दमदार कमबॅक केलं. 

तुम्हाला माहितच असेल 'मर्दानी'मध्ये जसं यशराज फिल्म्सने 'काय पो चे' आणि 'वन बाय टू' फेम ताहिर राज भसीनला खलनायक म्हणून लॉंच केलं होतं. तसंच आता पिपींगमूनला एक्सक्लुयुझिव्ह मिळालेल्या वृत्तानुसार ते 'मर्दानी 2'मध्ये सुध्दा एका नव्या चेह-याला संधी देत आहेत. टीव्ही अभिनेता विशाल जेठवा या सिनेमात खलनायक रंवणार आहे.

विशालने सोनी टीव्हीवरील  'भारत का वीर पुत्र: महाराणा प्रताप' मध्ये अकबर ची व्यक्तिरेखा साकारली होती तर बिग मॅजिकच्या 'चक्रधारी अजय कृष्ण'मध्ये श्रीकृष्ण साकारला होता. त्याच्यासाठी 'मर्दानी 2' हा कारकिर्दीतला मोठा ब्रेक ठरणार आहे. 

गोपी पूथरन  दिग्दर्शित 'मर्दानी 2' येत्या डिसेंबर 13 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.  

Recommended

Loading...
Share