Exclusive: खुद्द जेम्स बाँड रणवीर सिंगला घाबरला! 'नो टाईम टु डाय'ने रणवीरच्या '83' सोबत टक्कर टाळली

By  
on  

तुम्ही वाचलं ते अगदी खरंय... जेम्स बाँड रणवीर सिंगला घाबरलाय का? तर याचं उत्तर हो! जेम्स बाँड सिरीजचा 25 वा सिनेमा 'नो टाईम टु डाय' एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. परंतु पिपिंगमूनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह बातमीनुसार जेम्स बाँड सिरीजच्या 'नो टाईम टु डाय' सिनेमाने '83'सोबत प्रदर्शित होण्याचे टाळले असुन आपली रिलीज डेट पुढे सरकवली आहे. 

2015 साली बाँड मालिकेतला 'स्पेक्टर' सिनेमा रिलीज झाला होता. 'नो टाईम टु डाय' हा डॅनियल क्रेगचा बाँडच्या भुमिकेतला शेवटचा सिनेमा असणार आहे. यर 2019 मध्ये ब्लाॅकबस्टर 'गली बाॅय' नंतर कबीर खान दिग्दर्शित भारताने 1983 साली जिंकलेल्या पहिल्या वर्ल्डकपवर आधारीत '83' ची सर्वांना उत्सुकता आहे. रणवीर या सिनेमात कपील देवची भुमिका साकारत आहे. 

'83' सारख्या इतक्या मोठ्या बाॅलिवुड सिनेमासोबत प्रदर्शित न होण्याचा निर्णय 'नो टाईम टु डाय' चे निर्माते असलेल्या 'युनिव्हर्सल पिक्चर'ने घेतला आहे. हा निर्णय त्यांना किती फायद्याचा ठरतो हे पाहाणं औत्सुक्याचं आहे.

Recommended

Loading...
Share