Exclusive: दोन दिवस मुंबईत आणि त्यानंतर गोव्यात 'सुर्यवंशी'च्या गाण्याचं शुट होणार

By  
on  

सर्वांना रोहीत शेट्टीच्या आगामी अक्षय कुमारची प्रमुख भुमिका असलेल्या 'सुर्यवंशी' ची सर्वांना उत्सुकता आहे. यामध्ये अक्षय कुमार अँटी टेररिस्ट स्क्वाड वीर सुर्यवंशी पोलीसाची भुमिका साकारत आहे. पिपिंगमूनला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह बातमीनुसार या वीकएंडमध्ये रोहीत शेट्टी 'सुर्यवंशी'चं शेड्युल रॅप करणार आहे. 

सध्या या 'सुर्यवंशी'चं मुंबईत शुट सुरु आहे. दोन दिवस या अॅक्शनपॅक सिनेमाचं मुंबईत शुट सुरु आहे. त्यानंतर 'सुर्यवंशी'तील एका गाण्याचं शुट गोव्याला होणार आहे. 'सुर्यवंशी'मधुन अजय देवगणचा बाजीराव सिंघम आणि रणवीर सिंगचा संग्राम भालेराव म्हणजेच 'सिंबा' हे सुद्धा 'सुर्यवंशी' मधुन एकत्र पाहायला मिळणार आहेत. 

या तीन सुपरस्टारला एकत्रित एकाच सिनेमात पाहाणं ही फॅन्ससाठी मोठी पर्वणी असणार आहे. परंतु त्यासाठी मार्च 2020 पर्यंत चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे.

Recommended

Loading...
Share