Exclusive: विक्रमदित्य मोटवानी यांच्या ‘AK v/s AK'मध्ये शाहिद ऐवजी अनिल कपूर यांची वर्णी?

By  
on  

2017मध्ये विक्रम मोटवानी अनुराग कश्यप आणि शाहिद कपूरला घेऊन ‘SK v/s AK' हा सिनेमा काढणार होते. पण काही दिवस शुटिंग केल्यानंतर शाहिदने हा सिनेमा सोडला. त्यानंतर हा प्रोजेक्ट थांबला. यानंतर शाहिद पद्मावतमध्ये दिसून आला. त्यामुळे हा प्रोजेक्ट तसाच अर्धवट राहिला. विक्रमादित्य मोटवानी आता पुन्हा एकदा या सिनेमाची सुरुवात करणार असल्याचं पीपिंगमूनला समजलं आहे.

 

नव्या कलाकारांसोबत या सिनेमाची सुरुवात होणार आहे. अनुरागसोबत या सिनेमात आता अनिल कपूर झळकणार आहे. या सिनेमाचं शेड्युल अजून फिक्स व्हायचं आहे. नायिका कोण असेल याबाबतही निश्चिती झाली नाहीये. या सिनेमाचं नाव मात्र ‘SK v/s AK' ऐवजी ‘AK v/s AK' हे असणार आहे. या सिनेमात दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्या संघर्षाविषयी कथानक आहे. हा सिनेमा एक डार्क रिवेंज ड्रामा असणार आहे.

Recommended

Loading...
Share