Exclusive: अजय देवगन आणि रोहीत शेट्टी दिवाळी 2021 मध्ये 'गोलमाल 5' करणार रिलीज?

By  
on  

डिसेंबरच्या सुरुवातीलाच रोहीत शेट्टी आणि अजय देवगनच्या लोकप्रिय गोलमाल सीरीजचा पाचव्या सिनेमाची घोषणा झाली. पिपिंगमूनला एक्सक्लुझिव्हली ही बातमी मिळाली आहे की अजय देवगन आणि रोहीत शेट्टी 2021 च्या दिवाळीमध्ये 'गोलमाल 5' रिलीज करण्याच्या विचारात आहेत. 

रोहीतसोबत फोटो शेयर करत अजय म्हणाला,"मी आणि रोहीतने गोलमाल सिरीजचा पुढचा सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. गोलमाल 5 हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतला पहिला पाचवा भाग असणारा सिनेमा असणार आहे."

सध्या अजय 'तानाजी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अजय देवगनसह सैफ अली खान, काजोल, शरद केळकर आदी कलाकार या सिनेमात महत्वपुर्ण भुमिका साकारत आहेत. हा सिनेमा 10 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share