Exclusive: भूमी पेडणेकरचा ‘दुर्गावती’ आयएएस ऑफिसर दुर्गाशक्ती नागपाल यांच्या जीवनावर आधारित?

By  
on  

 भूमी पेडणेकरचा नवा सिनेमा दुर्गावती 2020च्या जानेवारीमध्ये रसिकांच्या भेटीला येत असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतच. याशिवाय हा एक हॉरर सिनेमा असल्याचंही समोर आलं होतं.पण आता या सिनेमाबाबत आणखी एक खास बातमी पीपिंगमूनला मिळाली आहे. हा सिनेमा तेलुगु सिनेमा भागमतीचा रिमेक आहे. भागमतीमध्ये एका महिला अधिका-याला चौकशीसाठी एका झपाटलेल्या बंगल्यामध्ये ठेवलं जातं. त्यानंतर भुताटकीचे प्रकार सुरु होतात. 

दुर्गावतीची बेसलाईनही अशीच काहीशी आहे. पण दुर्गावतीची व्यक्तिरेखा आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्यावर बेतली असल्याचं समजत आहे. नागपाल यांनी उत्तर प्रदेश मधील अखिलेश यादव यांच्या आशिर्वादाने चालत असलेल्या वाळू तस्करी विरोधात मोहीम उघडली होती. यावेळी दुर्गावतील यांच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. या सिनेमासाठी भूमी खुप उत्साहित आहे.

Recommended

Loading...
Share