Exclusive: धर्मा प्रॉडक्शनच्या नव्या सिनेमात दीपिका आणि सिद्धार्थसह अनन्याची वर्णी

By  
on  

अभिनेत्री अनन्या पांडेचा एक सिनेमा रिलीज होतो न होतो तोच नव्या सिनेमाबाबतची बातमी समोर येताना दिसते. पीपिंगमूनला मिळालेल्या महितीनुसार आता ती दिग्दर्शक शकुन बत्राच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत या सिनेमात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीही झळकणार आहे. या सिनेमाचं नाव अ‍जून ठरलं नसलं तरी तो मार्च 2020मध्ये फ्लोअरवर जाणार आहे.

 

 

या सिनेमात अनन्याला सशक्त व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळत आहे. शकुन दीपिकासोबत एक नवा चेहरा आणू इच्छित होते. त्यामुळे त्यांनी सिद्धार्थ आणि अनन्याची निवड केली आहे. शकुन यांचा हा सिनेमा आधुनिक जगात वावरणा-या दोन जोड्यांच्या आसपास फिरताना दिसतो.यातील एक कपल दीपिका आणि सिद्धांत आहे. आता अनन्यासोबत या सिनेमात आणखी कोणाची वर्णी लागेल हे लवकरच कळेल. हे तिघेही पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे या सिनेमासाठी त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील.

Recommended

Loading...
Share