Exclusive: मुंबई ट्रॅफिक पोलिसांसाठी अक्षयने शूट केला सामाजिक व्हिडियो

By  
on  

अभिनेता अक्षय कुमार अभिनयासोबत त्याच्या सामाजिक उपक्रमाबाबत ओळखला जातो. आताही अक्षयने वरळी सी-लिंकवर मुंबई ट्रॅफिक कंट्रोल ब्रांचसाठी एक व्हिडियो शूट केला आहे. यावेळी अनेकांना वाटलं की अक्षयचं शुटिंग सुरु असल्याने ट्रॅफिक जाम झालं आहे की काय... अभिनेता अक्षयने मुंबई ट्रॅफिक कंट्रोल ब्रांचसाठी शूट करत असला तरी काही लोकांनी मात्र अक्षयमुळे ट्रॅफिक जॅम होत असल्याची तक्रार सोशल मिडियावर केली. 

यापुर्वीही अक्षयने व्हाईट युनिफॉर्म घातलेल्या ट्रॅफिक पोलीसाची भूमिका साकारत लोकांचं प्रबोधन केलं होतं. अक्षयने सुर्यवंशीचं शुटिंग नुकतंच संपवलं आहे. हा सिनेमा 27 मार्च 2020ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share